Khandala Ghat: खंडाळा घाटात मदतीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू! हृदयद्रावक घटनेने खोपोलीत शोककळा
Khandala Ghat: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील ट्रॅफिक कोंडी सोडवण्यासाठी मित्रांसह धावला होता अमन; अवघ्या २२ व्या वर्षी जगाचा निरोप.
Updated On:

Khandala Ghat – मुसळधार पावसामुळे बोरघाटात रस्त्यावर झाड कोसळले आणि वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करुन नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या अमन मुजावर (वय -२२, रा.शिळगांव) या तरूणाच्या पोटावर झाड कोसळले. तरी त्याने मदतकार्य सुरू ठेवले. परंतु यामुळे दोन दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. झाड कोसळून किंवा इतर अपघातांमध्ये इतरांना मदत करताना जीव गमावल्याच्या घटनेने खोपोलीत शोककळा पसरली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई – पुणे जुन्या महामार्गावर झाडं आणि दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे पाहून अमन मुजावर आणि त्याचे मित्र जपत खंडाळा घाटातील झाडे बाजूला करण्यासाठी भर पावसात पोहचले. पिकअप व्हॅनला झाड बांधून बाजूला करीत असताना झाडाची रस्सी सुटली आणि झाड अमनच्या पोटावर पडले अमन थोडावेळ खाली पडला आणि पुन्हा ताकदीने उभी राहिला.
पोटाला वेदना झाल्या तरी मदतकार्य करून घरी परतला. पोटाला लागलेल अमन घरी सांगितले नाही आणि दोन दिवसांनी अमनने जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण खोपोली शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. अमन मुजावर याच्या पश्चात आईवडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.




