खडकवासला – पीएमआरडीए विकास आराखड्याबाबत हरकती व सूचना सादर करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.
पीएमआरडीएने 30 जुलै रोजी प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर शेतकरी यांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. परंतु विकास योजना अहवाल प्रसिद्ध केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. हरकती व सूचनांसाठी आणखी एक महिना मुदत द्यावी, असे मनसेचे खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष विजय मते यांनी म्हटले आहे. यावेळी अतुल मते, रमेश करंजावणे, विक्रम मते, अरविंद मते, राजाराम वाटाणे, सतीश चौधरी उपस्थित होते.