Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; सियासोबत ‘या’ ठिकाणी…
लोणावळ्याजवळील ऐतिहासिक आणि दुर्गम अशा लोहगड किल्ल्यावरून आपला होणारा पती केतन अग्रवाल (Ketan Agrawal Case) याला दरीत ढकलून देण्यापूर्वी, मुख्य आरोपी तरुणी सिया हिने याचा मोठा सराव केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Ketan Agrawal Case : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक आणि दुर्गम अशा लोहगड किल्ल्यावरून आपला होणारा पती केतन अग्रवाल (Ketan Agrawal Case) याला दरीत ढकलून देण्यापूर्वी, मुख्य आरोपी तरुणी सिया हिने याचा मोठा सराव केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सियाने हा भयंकर कट अचानक रचला नव्हता, तर तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Ketan Agrawal Case) मिळून या संपूर्ण कृत्याची आधी रीतसर प्रॅक्टिस केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी या संतापजनक आणि तितक्याच चक्रावून टाकणाऱ्या कटाचा पर्दाफाश केला असून, या संपूर्ण प्रकरणात आता रोज नवनवीन आणि थरारक खुलासे होत आहेत.
या खुनाच्या प्रॅक्टिसची खातरजमा करण्यासाठी आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आता आरोपी सियाला सोबत घेऊन थेट त्या डोंगरावर पोहोचले आहेत.
केतन अग्रवालला (Ketan Agrawal Case) लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून धक्का देऊन मारण्यात सियाला सहज यश आले नव्हते, कारण त्यासाठी तिने तिचा बॉयफ्रेंड चेतन याच्यासोबत मिळून एक अतिशय क्रूर आणि भयंकर कट रचला होता.
पुणे येथील लुल्ला नगर सेक्टर नंबर ३७ मधील एका डोंगरावर या दोघांनी मिळून केतनला कड्यावरून नेमके कसे ढकलायचे, याची पूर्ण ताकदीने प्रॅक्टिस केली होती. विशेष म्हणजे, हा डोंगर सियाच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
आपल्याच होणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने डोंगरावर जाऊन अशी खुनाची प्रॅक्टिस केल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणाही पूर्णपणे चक्रावून गेली आहे.
या हाय-प्रोफाईल तपासाचा एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलीस गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सियाला घेऊन पुण्याच्या मार्केट यार्ड भागातील ‘लीला कुंज’ या तिच्या निवासस्थानी पोहोचले होते. या घरात सियाचे वडील प्रवीण गोयल, तिची आई आणि भाऊ साहिल गोयल राहतात. या घरात पोलिसांनी सुमारे दोन तास ठाण मांडले होते.
यादरम्यान पोलिसांनी सियाच्या जुन्या जबाबांची कसून उलटतपासणी केली आणि घरातून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. घरची ही प्राथमिक चौकशी आणि झाडाझडती पूर्ण केल्यानंतर, पोलीस तिला थेट लुल्ला नगर येथील त्याच डोंगरावर घेऊन गेले आहेत, जिथे तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडने धक्का देण्याचा प्रत्यक्ष सराव केला होता.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरावाच्या ठिकाणाहून आणि सियाच्या घरातून या प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे आणि ठोस पुरावे हाती लागण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कड्यावरून ढकलून देण्याचा हा सराव नेमका कसा केला गेला आणि यामध्ये चेतनने तिला कशी व कोणती मदत केली, याचे तांत्रिक तसेच प्रत्यक्ष पुरावे पोलीस सध्या गोळा करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाने पुर्वी कधीही न ऐकलेल्या या क्रूरतेमुळे पुण्यासह (Ketan Agrawal Case) संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत.






