Ketan Agarwal Case : कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर
Ketan Aggarwal Case : आता या प्रकरणात पोलिसांनी तपासाचा अँगल वेगळ्या दिशेने सुरू केला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

Ketan Aggarwal Case : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांवर केतनची लोहगड किल्यावर नेऊन उंच कठड्यावरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. दोघांची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या प्रकरणात अनेकांची साक्ष पोलिसांकडून नोंदवली जात आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी तपासाचा अँगल वेगळ्या दिशेने सुरू केला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. (Ketan Agarwal Case)
कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? पोलिसांकडून तपास सुरू (Ketan Aggarwal Case)
प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून सिया आणि चेतन या दोघांनी मिळून अतिशय थंड डोक्याने केतनची हत्या केली. त्याची हत्या नसून हा केवळ अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दोघांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता पोलिसांकडून या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा समावेश आहे का ? या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा : Anjali Anand : ‘जाड मुलींना काम कसं मिळतं?’ अभिनेत्रीची उडवली जायची खिल्ली; अंजली आनंदने कामातून दिलं उत्तर
अनेकांचे घेतले जबाब (Ketan Agarwal Case)
&imwidth=800&imheight=600&format=webp&quality=medium)
Ketan Agarwal Case : कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर
त्यामुळे उरलेल्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत सिया आणि चेतनकडे या अँगलने तपास केला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई नेमकी कोणाकडे आहे? आणि ती व्यक्ती नेमकी कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. केतनच्या हत्येप्रकरणी सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा अशा संपूर्ण गोयल कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली. सिया आणि केतनच्या लग्न ठरविण्यात मध्यस्थी असणारे मित्तल दाम्पत्याचे दोन दिवस जबाब नोंदवण्यात आला.
कोणती नवी समोर येणार याकडे लक्ष (Ketan Agarwal Case)
बालीला प्री-विडिंग शूटसाठी जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हरकडून घटनाक्रम जाणून घेण्यात आला. यामधून पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. पोलिस चेतन आणि सिया यांना लोहगडावरून घेऊन गेले आणि घटनास्थळी हत्येचा सीन रिक्रियेट करण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Rain Latest Upates: महाराष्ट्रातील अनेक भागात आजही धो-धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी





