Kerim Alajbegovic Record : १८ वर्षांच्या पोराने मोडला एम्बाप्पेचा वर्ल्ड रेकॉर्ड! कतारला ३-१ ने लोळवत बोस्निया बाद फेरीच्या उंबरठ्यावर
Kerim Alajbegovic Record : बोस्नियाचा १८ वर्षांचा युवा स्टार केरीम अलाजबेगोविच, ज्याने फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेचा एक मोठा जागतिक विक्रम मोडला.

Kerim Alajbegovic break Mbappe World Record : फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत ग्रुप ‘बी’ मधील एका अतिशय महत्त्वाच्या आणि चुरशीच्या सामन्यात बोस्नियाने आशियाई चॅम्पियन कतारचा ३-१ असा धुव्वा उडवला आहे. सिअॅटल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या ‘करो या मरो’च्या सामन्यातील विजयामुळे कतारचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर बोस्नियाने ग्रुपमध्ये तिसरे स्थान पटकावत बाद फेरीच्या (Round of 32) आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो बोस्नियाचा १८ वर्षांचा युवा स्टार केरीम अलाजबेगोविच (Kerim Alajbegovic), ज्याने फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेचा एक मोठा जागतिक विक्रम मोडला.
अलाजबेगोविचने मोडला एम्बाप्पेचा विश्वविक्रम – (Kerim Alajbegovic Record)
सामन्याच्या २९ व्या मिनिटाला अलाजबेगोविचने दोन इराकी डिफेंडर्सना चकवून पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून (२० यार्ड अंतरावरून) एक असा तूफानी शॉट मारला, ज्याचे कतारच्या गोलकीपरकडे कोणतेही उत्तर नव्हते. या जादुई गोलसह तो फिफा विश्वचषकात पेनल्टी एरियाच्या बाहेरून गोल करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. त्याने किलियन एम्बाप्पेचा (१९ वर्षे २०७ दिवस, २०१८ विश्वचषक) विक्रम मोडला. तसेच तो विश्वचषक इतिहासातील ८ वा सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
पहिल्या हाफमध्ये बोस्नियाची पकड; दुसऱ्या हाफमध्ये विजयावर शिक्कामोर्तब – (Kerim Alajbegovic Record)
Kerim Alajbegović becomes the eighth-youngest goalscorer in #FIFAWorldCup history 🇧🇦 pic.twitter.com/tWSnOqT8SV
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 24, 2026
सुरुवातीच्या गोलनंतर ३४ व्या मिनिटाला कतारच्या सुलतान अल-ब्रेकच्या ओन-गोलमुळे बोस्नियाला २-० अशी आघाडी मिळाली. ४२ व्या मिनिटाला कतारचा कर्णधार हसन अल-हेदोसने गोल करत स्कोर २-१ केला.
दुसऱ्या हाफमध्ये कतारने बरोबरीसाठी अनेक आक्रमणे केली, पण सामन्याच्या ८० व्या मिनिटाला बोस्नियाच्या एरमिन महमिचने गोल करत संघाचा ३-१ असा शानदार विजय निश्चित केला. या पराभवासोबतच कतारचा संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बोस्निया आता ३ सामन्यांत ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, पुढील फेरीसाठी त्यांना इतर ग्रुप्सच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागेल.





