Suicide | महिला बॅंक मॅनेजरची आत्महत्या; बॅंकेत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Updated On:

तिरूअनंतपुरम – केरळ राज्यातील कन्नूर येथील कॅनरा बॅंकेच्या महिला बॅंक मॅनेजरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डिप्रेशनमुळे महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. के.एस. स्वप्ना (वय 40) असे आत्महत्या केलेल्या महिला मॅनेजरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्ना यांचे काही दिवसांपूर्वीच त्रिशूर येथून कन्नूर येथील शाखेत शाखा प्रमुख म्हणून प्रमोशन झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आहेत. स्वप्ना यांनी सकाळी सव्वा आठ वाजता बॅंकेत येऊन शालीने गळफास घेतला.
पोलिसांना स्वप्ना यांची डायरी सापडली आहे. ती तपासली असता त्या डिप्रेशनमध्ये असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कन्नूर पोलीस करत आहेत.




