Suryanarayana Doolla : आयआयटी मुंबईचे डीन सूर्यनारायण डुल्ला यांचे निलंबन
आयआयटी मुंबई येथे शिकणाऱ्या साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय कामकाज विभागाचे डीन सूर्यनारायण डुल्ला (Suryanarayana Doolla) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Suryanarayana Doolla : आयआयटी मुंबई येथे शिकणाऱ्या साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय कामकाज विभागाचे डीन सूर्यनारायण डुल्ला (Suryanarayana Doolla) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सूर्यनारायण डुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून साहिलच्या मृत्यूप्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.
साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. सलग तीन दिवस मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी केलेल्या धरणे आंदोलनानंतर संस्थेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या 18 मागण्या मान्य केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे घडलेल्या घटनेबद्दल संस्थेने माफीदेखील मागितल्याचे समोर आले आहे.
साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर विविध सामाजिक संघटनांकडून डुल्ला (Suryanarayana Doolla) यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर पोलिसांनी डुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई आयआयटीने डुल्ला यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. यावेळी त्यांच्यावर ऍट्रोसिटी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या यवतमाळच्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने शुक्रवारी हॉस्टेलच्या रूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. तो एनर्जी इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होता. निलंबनाची कारवाई केल्यानंतर आयआयटी मुंबईने एक अधिकृत निवेदन जारी केले. याद्वारे म्हटले की, साहिलच्या दुर्दैवी निधनाबाबतच्या परिस्थितीविषयी आम्ही आधी केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागतो.
या घटनेमागील परिस्थितीचा तपास योग्य प्राधिकरणांकडून (Suryanarayana Doolla) सुरू आहे. तपास पूर्ण होण्याआधीच घटनेची माहिती आणि तपशील प्रसिद्ध करणे किंवा त्यावर भाष्य करणे अयोग्य होते, असेही म्हटले आहे.






