Shahid Afridi : दुबईतील केरळ समुदायावर टीकेचा भडिमार; आफ्रिदीच्या स्वागताने वाद, VIDEO व्हायरल

A Kerala community in Dubai faces criticism : दुबईमध्ये राहणाऱ्या केरळमधील एका समुदायावर सध्या सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. त्यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत केले होते. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आफ्रिदीने वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्यात भारतातील २६ जणांचा मृत्यू झाला होता.
केरळच्या एका समुदायाच्या कार्यक्रमाला आफ्रिदीची हजेरी –
त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, आफ्रिदी मंचावर पोहोचताच, सांस्कृतिक कार्यक्रम थांबवून समुदायातील लोक “बूम बूम” च्या घोषणांनी त्यांचे स्वागत करतात. मंचावर बोलताना आफ्रिदीा म्हणाला, “मला भारतात, विशेषतः केरळचा भाग आणि तिथले जेवण खूप आवडते.” यानंतर तो मिश्किलपणे पुढे म्हणाला, “झाले बूम बूम!”
“The Mysterious India Series”: Shahid Afridi criticizes India and the Indian armed forces while supporting extremists, yet the Indian community from Kerala in Dubai welcomes him.” My head bows in shame and my blood boils. What would that soldier on borders would think when he… pic.twitter.com/kYU4pmKos8
— Lt Col Sushil Singh Sheoran, Veteran (@SushilS27538625) May 30, 2025
पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदीने केले होते वादग्रस्त वक्तव्य –
अलीकडेच आफ्रिदीने पाकिस्तानच्या समा टीव्ही चॅनलवर बोलताना भारतावर टीका केली होता. तो म्हणाला होता की, “जर भारतात फटाके फोडले तर त्याचा दोष पाकिस्तानवर येतो.” त्याने भारतीय सैन्यावरही टीका केली होती. आफ्रिदी म्हणाला होता, “काश्मीरमध्ये ८ लाखांची फौज आहे, तरीही हे घडले. याचा अर्थ असा की तुम्ही लोक निरुपयोगी आहात, अक्षम आहात, तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही.”
हेही वाचा – GT vs MI : साई-वॉशिंग्टनच्या फटकेबाजीमुळं बुमराह-जयवर्धनेची जुंपली, PHOTOS होतायेत व्हायरल
त्याने भारतीय माध्यमांच्या कव्हरेजला “बॉलिवूड ड्रामा” म्हटले होते. तसेच अप्रत्यक्षपणे भारतीय क्रिकेटपटूंनाही लक्ष्य केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)’ ने घेतली होती, जी बंदी घातलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी जोडलेली आहे. त्यामुळे केरळ समुदायावर सोशल मीडियावरुन टीका होत आहे.





