यवत – दौंड तालुक्यातील केडगाव येथे असलेल्या मोहन जनरल सेंटर या हॉस्पिटलमध्ये काल (दि. 28) एप्रिल रोजी चार रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच मृत्यू झाल्याच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास मृताच्या नातेवाइकांनी नकार देत रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला.
दौंड तालुक्यात करोना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आधी रुग्णालय कमी पडत आहेत केडगाव येथे देखील मोहन जनरल हॉस्पिटल येथे को बीड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत उपचार घेणारे गोंधळ करू नये ऑक्सिजन बेडवर आहेत. काल दुपारी येथील रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांनी दावा केला त्यामुळे उपचार घेत असलेल्या या चार रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
तसेच दौंड तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी चार उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती दिली. परंतु त्यापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी रात्री उशिरा तहसीलदार संजय पाटील प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार दौंड तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पाहणी करून हा सर्व प्रकार कोणत्या कारणामुळे घडून आला याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. दरम्यान या रुग्णालयात यापूर्वी देखील अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज चार रुग्णांचा मृत्यू झाल्याबाबत तहसीलदार संजय पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या घटनेची माहिती देण्यास आरोग्य व महसूल विभागाने टाळाटाळ केली.