कतरिना – विकीकडे ‘गुड न्युज’; व्हिडिओत दिसला ‘बेबी बंप’

Bollywood News । अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नेंसी असल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आहे. अनेकदा सोशल मीडियावर या जोडप्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत प्रेग्नेंसीच्या चर्चाही जोरदार रंगताना दिसतात. अशातच आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा लाल साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिचा बेबी बंब दिसत असल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
नुकतेच कतरिना आणि विकीने अनंत अंबानींच्या लग्नाला हजेरी लावली यावेळी त्यांनी मिडीयासमोर पोज देत फोटोसेशन केले. यावेळी लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री सुंदर दिसत होती. कतरिनाने अनकट डायमंड सेट घातला होता, जो तिच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत होता. तर विकी कोसल क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती.
अशात या जोडप्याच्या वेडिंग एन्ट्रीशी संबंधित व्हिडिओ पाहून कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. इतकेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सचे म्हणणे आहे की आता अभिनेत्रीचा बेबी बंप देखील स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘केटचे बेबी बंप दिसत आहे, लवकरच गुड न्यूज मिळणार आहे.’ मात्र या चर्चांवर या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर 2021 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले.





