Mumbai Marathon 2024 : केटी मून मुंबई मॅरेथॉनची अँम्बेसेडर….
Updated On:

मुंबई – पोल व्हॉल्टमध्ये दोन वेळा विश्वविजेती आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती केटी मूनची रविवारी येथे होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोजकांनी बुधवारी ही माहिती दिली.
मुंबई मॅरेथॉनला जागतिक अॅथलेटिक्समधून ‘गोल्ड लेव्हल’ शर्यतीचा दर्जा आहे. अमेरिकेच्या स्टार अॅथलीट मूनने २०२२ मध्ये यूजीन आणि २०२३ मध्ये बुडापेस्ट वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे.
नियुक्तीनंतर केटी म्हणाली की, जीवनाच्या शर्यतीत धावताना, प्रत्येक पाऊल प्रेरणा आणि बदल घडवून आणण्याची संधी असते. टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर म्हणून नावाजल्याचा मला सन्मान वाटतो, जिथे प्रत्येक पाऊल लवचिकता, दृढनिश्चय आणि समुदायाची भावना आहे.





