कश्मिरा शाहचा झाला अपघात; रक्ताने माखलेल्या कपड्यांचे शेअर केले फोटो

Kashmera Shah | अभिनेत्री कश्मिरा शाहचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: कश्मिराने इनस्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या कपड्यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. कश्मीराने फोटो शेअर करताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेकांनी तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली आहे.
कश्मिराने इनस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “मला वाचवण्यासाठी देवाचे आभार. खूप भयानक घटना होती. काहीतरी मोठं घडलं असतं. परंतु थोडक्यात निभावलं. जखमेच्या खुणा राहणार नाहीत याची मला आशा आहे. प्रत्येक क्षण जगा. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येते.” Kashmera Shah |
कश्मीराच्या या पोस्टखाली कृष्णा अभिषेक “देवाच्या कृपेने तू ठीक आहेस,” असे म्हणतो. दरम्यान, अभिनेत्री कश्मिरा शाह हिचा लॉस एंजेलिस येथे मोठा अपघात झाला आहे. तिचा पती कृष्णा काही दिवसांपूर्वीच आपल्या दोन्ही मुलांसोबत मुंबईत आला होता. तेव्हाच कश्मिराचा एल ए मध्ये मोठा अपघात झाला. कृष्णा सध्या त्याची मुलं रेयान आणि कृषांग यांच्यासोबत मुंबईत आहे. तर कश्मिरा परदेशात आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कश्मिरा लाफ्टर शेफ शोमध्ये पती कृष्णा अभिषेकसोबत पाहायला मिळते होते. या शोमध्ये कश्मिराने खूप धम्माल करत चाहत्यांचे मनोरंजन केले. या शोमध्ये निया शर्मा, करण कुंद्रा, अर्जुन बिलानी, रीम शेख असे स्टार्स होते. तर कृष्णा सध्या नेटफ्लिक्स शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसत आहे.
हेही वाचा:





