Anjali Damania : करुणा मुंडेंच्या जीवाला धोका; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली सुरक्षेची मागणी

बीड : करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर काल जे आरोप केले त्यानंतर त्यांना पोलिस सुरक्षा दिली पाहिजे, कारण तिचा घातपात करु शकतात. त्या घोटाळा बाहेर काढणार असे म्हणत आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा द्यायला हवी नाहीतर त्यांना ही मारून टाकले जाईल, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
दमानिया पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंना कॅरेक्टर नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का केला जात आहे. या व्यक्तीने हजारो भ्रष्टाचार करत जनतेची लूट केलेली आहे, कोटींचे स्कॅम केले आहेत. इतके असूनही धनंजय मुंडे यांना का वाचवले जातंय?, मंत्री म्हणून का ठेवले जात आहे.
दमानिया पुढे म्हणाल्या की, 9 डिसेंबर ला एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुख यांच्या हत्यारांचा गाडीत 2 फ़ोन सापडले होते. ते फॉरेन्सिकमध्ये डाटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आले आहेत असे सांगण्यात आले होते. आज 58 दिवस झाले. अजून किती वेळ काढणार आहात? असा सवाल त्यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी.





