Sunetra Pawar : राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी! नव्या कार्यकरिणीत धनंजय मुंडेंना मिळणार संधी? सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Sunetra Pawar : ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे यादीत नसल्याने पक्षात नाराजीची चर्चा रंगली होती.

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेला वाद आता शांत होण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे यादीत नसल्याने पक्षात नाराजीची चर्चा रंगली होती.
या सगळ्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी हा प्रकार “तांत्रिक चूक” असल्याचे स्पष्ट करत लवकरच सुधारित यादी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. लवकरच नव्या राष्ट्रीय कार्यकरणीची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. (Sunetra Pawar)
या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना स्थान देण्यात येणार असून, काही नवीन नावांचाही समावेश केला जाणार असल्याची विचार सुरू आहे.
या यादीत आमदार धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे. तसा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काल २० मे बुधवारी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या कार्यकरिणीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Sunetra Pawar)
नव्याने जाहीर होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हसन मुश्रीफ, छगन भुजबळ या जेष्ठ नेत्यांसह अनिल पाटील आणि धनंजय मुंडे या नेत्यांच्या नावाचा समावेश असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या भेटींचा विषय राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भेटींचा सिलसिला सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी कार्यकरणी जाहीर करण्यापूर्वी अंतर्गत चर्चा करून पक्षातील विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.






