Anjali Damania : ‘तटकरे भाजपात जातील अशी परस्थिती होती’; दमानियांचं मोठं वक्तव्य
Anjali Damania : यावेळी बोलताना दमानिया यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

Anjali Damania : चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.
राज्यात गाजत असलेल्या आणि सातत्याने नवी माहिती समोर येत असणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर बोलताना, या प्रकरणातील संशयित भोंदू अशोक खरात याचे रूपाली चाकणकर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला. “राजकारण नेमकं अशाच लोकांच्या हातात चालणार का? कोणत्या मंत्र्याला कोणते पद द्यायचे हेही आता असे लोक ठरवणार का?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. Anjali Damania
दमानियांचा मोठा दावा (Anjali Damania)
यावेळी बोलताना दमानिया यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.”सुनील तटकरे आणि अजितपवारांसोबत एक ते सव्वा वर्ष पटतं नव्हतं. त्यांचे वारंवार खटके उडत होते. ते अजित पवारांपासून अनेक गोष्टी लपावायचे. त्यामुळे तटकरे भाजपात जातील अशी परस्थिती होती. ” असा मोठा दावा दमानिया यांनी केला आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात दमानिया यांनी केलेल्या दाव्याची चर्चा असून, या दाव्याला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

‘तटकरे भाजपात जातील अशी परस्थिती होती’; दमानियांचं मोठं वक्तव्य
सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीची राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. सारे काही आलबेल असं वाटतं असलं तरी अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे यांना पक्षनेतृत्वाकडून डावलले जात असल्याचे बोलले जात आहे.
या साऱ्या चर्चा सुरू असतानाच तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळू लागल्याची कुजबूज होत आहे.
…त्यामुळे संशय अधिक गडत होतो : दमानिया (Anjali Damania)
अशोक खरात याने एका मोबाईलमध्ये तब्बल पाच वेगवेगळी सिमकार्ड वापरल्याचे उघड झाले आहे. यावरून हे संपूर्ण रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीने चालवले जात असल्याचा संशय अधिक गडद होत असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.





