IND vs ENG : करुण नायरचा ऐतिहासिक पराक्रम, बनला क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू!

IND vs ENG Karun Nair Sets World Record in Comeback : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथ खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या युवा संघाने जैस्वाल-गिलच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३५९ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. दरम्यान या सामन्याच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनध्ये खूप वर्षांनी स्थान मिळवून करुन नायरने एक इतिहास रचला आहे.
करुन नायरचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक –
करुन नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला होता आणि त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आपली चमक दाखवली होती. त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला केवळ भारतीय कसोटी संघात स्थानच मिळाले नाही, तर थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळाला. करुण नायरने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता तो ८ वर्षांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
करुन नायरने रचला इतिहास –
2016 ➡️ 2025
All the best @karun126#indvseng #coti🇮🇳 #bharatarmy #karunnair pic.twitter.com/l4rz2rB60C
— The Bharat Army (@thebharatarmy) June 20, 2025
Most Tests missed between two appearances for India 118 Jaydev Unadkat (2010-22)
87 Dinesh Karthik (2010-18)
83 Parthiv Patel (2008-16)
77 #KarunNair (2017-25)
56 Abhinav Mukund (2011-17)#TeamIndia #INDvsENG pic.twitter.com/wIJkTEIhsV— lightningspeed (@lightningspeedk) June 21, 2025
या कालावधीत करुण नायरने भारतीय संघासाठी एकूण ४०२ आंतरराष्ट्रीय सामने मिस केले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तो क्रिकेट विश्वातील एकमेव खेळाडू आहे ,ज्याने ४०० हून अधिक सामने मिस केले आहेत. यापूर्वी हा विक्रम वेस्टइंडीजच्या रयाद अमृतच्या नावावर होता. त्याने २००७ ते २०१८ या कालावधीत वेस्टइंडीज संघासाठी एकूण ३९६ आंतरराष्ट्रीय सामने मिस केले होते. आता नायरने त्यांचा विक्रम मोडला आहे.
हेही वाचा – ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने बाजी मारलीच; दोन वेळा पराभूत केलेल्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरला टाकलं मागे
करुण नायरने २०१६ मध्ये भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने एकूण ६ कसोटी सामन्यांमध्ये ३७४ धावा केल्या, यामध्ये त्याने एक त्रिशतकही ठोकले. नायरने हे त्रिशतक इंग्लंडविरुद्ध झळकावले होते. मात्र, पुढच्याच सामन्यापासून त्याला संघातून वगळण्यात आले. याशिवाय, त्याने भारतीय संघासाठी दोन एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यात त्याने ४६ धावा केल्या होत्या.





