Karun Nair Century: करुण नायरचं दमदार कमबॅक! बॅक टू बॅक ठोकली शतकं, पुन्हा टीम इंडियात परतणार?

Karun Nair 26th first class century : भारताचा अनुभवी फलंदाज करुण नायर पुन्हा एकदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतला आहे. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला कसोटी संघातून बाहेर करण्यात आले होते, परंतु आता रणजी ट्रॉफीमध्ये त्याने दमदार पुनरागमन केले आहे. कर्नाटकसाठी खेळताना करुणने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आणि आपल्या फलंदाजीने संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. यासह त्याने पुन्हा एकदा कमबॅक टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली मोठी कामगिरी –
१ नोव्हेंबरपासून मंगलापुरम (तिरुअनंतपुरम) येथील केसीए क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी एलिट गट-बी सामन्यात करुण नायरने पहिल्याच दिवशी शानदार शतक ठोकले. त्याने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने फक्त १६० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील २६वे शतक ठरले.
𝐁𝐀𝐂𝐊-𝐓𝐎-𝐁𝐀𝐂𝐊 𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐈𝐄𝐒 𝐅𝐎𝐑 𝐊𝐀𝐑𝐔𝐍 𝐍𝐀𝐈𝐑 𝐈𝐍 𝐑𝐀𝐍𝐉𝐈 𝐓𝐑𝐎𝐏𝐇𝐘 𝟐𝟎𝟐𝟓/𝟐𝟔! 🤍🔥
The Karnataka batter is showing his class and consistency after being dropped from India’s Test squad! 🇮🇳💯#KarunNair #Karnataka #India #BCCI #Sportskeeda pic.twitter.com/5pPLpsVweX
— Sportskeeda (@Sportskeeda) November 1, 2025
या शानदार खेळीदरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या. कर्नाटकचे सहावा फलंदाज म्हणून त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्याआधी राहुल द्रविड, गुंडप्पा विश्वनाथ, बृजेश पटेल, सय्यद किरमाणी आणि रॉबिन उथप्पा यांनी ही कामगिरी केली होती.
कर्नाटकच्या डावाला करुणने सावरले –
केरळविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने अवघ्या १३ धावांवर दोन गडी गमावले होते, परंतु या कठीण परिस्थितीत करुण नायरने धुरा सांभाळली. त्याने प्रथम कृष्णन श्रीजीत (६५ धावा) याच्यासह तिसऱ्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मरण रविचंद्रनसोबत चौथ्या गड्यासाठी शानदार भागीदारी निभावली.
पहिल्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत कर्नाटकने ३ गडी गमावून ३१९ धावा केल्या होत्या. करुण नायर १४२ धावांवर नाबाद होता, तर रविचंद्रन ८८ धावांवर खेळत होता. त्याच्या या खेळीमुळे कर्नाटकला सामन्यात मजबूत स्थिती पोहोचवले आहे.
करुण नायर सलग फॉर्ममध्ये
याआधीही करुण नायर रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. गोवाविरुद्ध त्याने १७४ नाबाद धावांची धडाकेबाज खेळी केली होती, तर सौराष्ट्रविरुद्ध ७३ धावा केल्या होत्या. सलग चांगल्या कामगिरीने तो पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे.





