CoochBehar Trophy 2024 : कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने बीसीसीआयच्या देशांतर्गत कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत इतिहास रचला. या अंडर-19 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने मुंबईविरुद्ध 404 धावांची नाबाद खेळी खेळली. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात 400 धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. प्रखरची फलंदाजी पाहून सर्वांना लारा आठवला.
प्रखरने कर्नाटकसाठी डावाची सुरुवात केली आणि डाव घोषित होईपर्यंत तो नाबाद राहिला. त्याने 638 चेंडूंचा सामना करत 46 चौकार आणि तीन षटकार ठोकले. कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एका डावात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिला डाव 890 धावांवर घोषित केला. त्याच्या फलंदाजांनी 223 षटकांचा सामना केला आणि संघाने आठ विकेट गमावल्या. प्रखरने 400 धावा पूर्ण करताच संघाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.
𝙍𝙀𝘾𝙊𝙍𝘿 𝘼𝙇𝙀𝙍𝙏! 🚨
4⃣0⃣4⃣* runs
6⃣3⃣8⃣ balls
4⃣6⃣ fours
3⃣ sixesKarnataka’s Prakhar Chaturvedi becomes the first player to score 400 in the final of #CoochBehar Trophy with his splendid 404* knock against Mumbai.
Scorecard ▶️ https://t.co/jzFOEZCVRs@kscaofficial1 pic.twitter.com/GMLDxp4MYY
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 15, 2024
कर्नाटककडून हर्षिल धर्मानीनेही झळकावले शतक…
विशेष म्हणजे याच सामन्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड यानेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 46 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. हर्षिल धर्मानी हा डावातील दुसरा शतकवीर ठरला. त्याने 228 चेंडूत 19 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 169 धावा केल्या. प्रखरने त्याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाव घोषित होण्यापूर्वी त्याने समर्थ एनसोबत नवव्या विकेटसाठी नाबाद 163 धावांची भागीदारी केली.
समित द्रविडने घेतले दोन बळी…
या सामन्याबद्दल सांगायचे तर, स्पर्धेचा अंतिम सामना केएससीए नेव्हुले स्टेडियमवर खेळला गेला. कर्नाटकने प्रथम मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा सिद्ध होईल असे एकेकाळी वाटत होते. मुंबईने पहिल्या डावात 380 धावा केल्या होत्या. मुंबईकडून आयुष म्हात्रेने 145 धावांची खेळी केली. कर्नाटककडून गोलंदाजी करताना समित द्रविडनेही दोन बळी घेतले.
कर्नाटक ठरला विजेता…
कर्नाटकने फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा प्रखरने इतर सर्व खेळाडूंची कामगिरी फिकी पडली. त्याने 404 धावा करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या डावात 510 धावांची मोठी आघाडी घेतली. चौथ्या दिवशी कर्नाटकने डाव घोषित केल्यावर दोन्ही संघांनी बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात आघाडी घेतल्याने कर्नाटक यंदाच्या मोसमात कूचबिहार ट्रॉफीचा चॅम्पियन(विजेता) ठरला आहे.