Karnataka News : बेळगावमध्ये इंजिनीअरच्या घरावर छापा ! सापडले कोट्यवधींचं घबाड
कर्नाटकच्या (Karnataka News) बेळगावमध्ये एका इंजिनीअरच्या घरात अफाट संपत्ती असल्याचे उघडकीस आले आहे.

Karnataka News : कर्नाटकच्या (Karnataka News) बेळगावमध्ये एका इंजिनीअरच्या घरात अफाट संपत्ती असल्याचे उघडकीस आले आहे. ‘सिटी डेव्हलपमेंट सेल’मधील असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर अजय सिंह राजपूत याच्याकडे १४ कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचे लोकायुक्त अधिका-यांनी उघड केले आहे.
या अफाट संपत्तीची तपासणी करण्यासाठी पथकाला (Karnataka News) तब्बल दोन दिवस लागले. दोन दिवस चाललेल्या या कारवाईत अंजनैया नगर येथील त्याचे निवासस्थान, कार्यालय परिसर आणि बँक लॉकरसह एकूण सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
तपासादरम्यान अधिका-यांना बेळगावमध्ये (Karnataka News) तीन घरं आणि सवदत्ती, हुबळी व हुक्केरी येथे १८ प्लॉट्स आढळले आहेत. या छापेमारीत ६ किलो सोनं, ५ किलो चांदी, ३.१२ कोटी रुपये, तसेच महागड्या लक्झरी कार आणि बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक कमावलेल्या मालमत्तेवर अधिका-यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.






