‘या’ राज्यात NEET परीक्षा द्यावी लागणार नाही ; गदारोळात नवे विधेयक मंजूर

Karnataka Bill Against NEET । देशात NEET संदर्भात सुरू असलेल्या गदारोळ सुरु आहे. हाच मुद्दा काल संसदेतही गाजला. त्यातच आता NEET ची परीक्षा देण्याची गरज नसल्याचे एका राज्याने म्हटले आहे. यासंदर्भातील एक विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने NEET रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कर्नाटकमध्ये NEET पेपर लीकच्या वादात हे नवीन विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
कर्नाटकात आणलेले हे विधेयक NEET परीक्षेच्या विरोधात आहे. यामध्ये, NEET ऐवजी इतर काही वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्याचा किंवा NEET ला कर्नाटकमधील कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) शी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक कर्नाटक विधानसभेत मांडण्यात येणार आहे. त्यात राज्याने बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा, अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे. NEET लागू होण्यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा पद्धतीने प्रवेश घेतले जात होते.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागणार Karnataka Bill Against NEET ।
दरम्यान, NEET UG परीक्षेतील कथित पेपर लीकवरून देशभरात गोंधळ सुरू असताना कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे विधेयक राज्य विधानसभेने मंजूर केल्यास, कर्नाटकच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना राज्य स्पर्धा परीक्षेला बसावे लागेल. त्यांना NEET मधून स्वातंत्र्य मिळेल. तथापि, NEET च्या जागी होणाऱ्या परीक्षेला काय म्हटले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तामिळनाडूतही NEET विरोधात ठराव मंजूर Karnataka Bill Against NEET ।
गेल्या महिन्यात, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) च्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने NEET विरोधात ठरावही मंजूर केला होता. द्रमुक सरकारने केंद्राकडे राज्य सरकारांना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. मनिथनेय मक्कल कच्ची, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, तमिलगा वेत्री कळघम आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यासह अनेक प्रादेशिक पक्षांनीही डीएमके सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
द्रमुकच्या खासदार के कनिमोझी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “आम्हाला NEET नको असे तामिळनाडू सातत्याने सांगत आहे. आता हे सिद्ध झाले आहे की NEET ही निष्पक्ष परीक्षा नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. “आम्ही NEET रद्द करू इच्छितो आणि राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी करणे बाकी आहे.”





