बंगरुळु : ५ डिसेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या नवनिर्वाचित १२ सदस्यांना राज्य सचिवालयातील बँक्वेट हॉलमध्ये आमदार म्हणून शपथ घेतली अशी माहिती रविवारी एका अधिका्याने दिली.
भाजपचे जी. मधुसूदन यांनी सांगितले की, “विधानसभा अध्यक्ष व्ही.एच. कागेरी यांनी ५ डिसेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या सर्व १२ सदस्यांना आणि एक अपक्ष आमदार यांना शपथ दिली.
१५ नवनिर्वाचित सदस्यांपैकी दोन कॉंग्रेसचे तर एक अपक्ष आमदार आहे. रिझवान अरशद, एचपी मंजुनाथ या काँग्रेच्या दोन आमदारानी कार्यक्रमाला दांडी मारत शपत घेतली नाही. या पोटनिवडणुकीचा निकाल ९ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता.
भाजप आमदारांमध्ये सुधाकर (चिक्काबल्लापूर), एस.बी. पाटील (कागवाड), बी.ए. बसवराज (आर पुरा), महेश कुमातल्ली (अथणी), एस.टी. सोमशेखर (बंगरुळु उत्तर यशवंतपूर), ए.एच. शिवराम (येलापूर), रमेश जरकीहोली (गोकक), जी.के. अरुणाकुमार (राणेबेनूर), बी.सी. पाटील (हिरेकुरु), नारायण गौडा (के आर पीट), आनंदसिंग (विजयपुरा) आणि के.के. गोपालैया (बेंगळूरु पश्चिम महालक्ष्मी लेआउट) बंगरुळु ग्रामीण मधून होसाकोट येथून अपक्ष शरथ कुमार बाचेगौडा विजयी झाले आहेत.