कर्जतचा विकास बेंद्रे ठरला खऱ्या आयुष्यातील ‘रँचो’! रेल्वे स्थानकावर केली महिलेची प्रसुती, रोहित पवारांकडून तरुणाचे कौतुक

Vikas Bendre | ‘थ्री इडियट्स‘ चित्रपटातील अमीर खानच्या ‘रँचो’चे पात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे. डॉक्टरची भूमिका केलेली अभिनेत्री करिना कपूर हिच्या सांगण्यावरून रँचो महिलेची प्रसुती करतो, असा एक सीन या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. असाच प्रकार मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये घडला आहे.
राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेंद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली आहे.
विकास बेद्रे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांच्या कर्जत मतदारसंघातील आहे. त्याने दाखवलेल्या तत्परतेचे सध्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. रोहित पवार यांनी देखील ट्वीटद्वारे विकासचे कौतुक केले आहे.
रोहित पवार यांचे ट्वीट
“माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशनवर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. Vikas Bendre |
माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं.… pic.twitter.com/o2OMHEHLA0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 16, 2025
परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन,” असे रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. Vikas Bendre |
नेमकं काय घडलं?
गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने बुधवारी रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी त्याच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.
त्यानंतर तरूणाने डॉ. देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल केला आणि त्यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन केले.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री सव्वा एक ते दोनच्या दरम्यान त्या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या आई आणि बाळ देखील सुरक्षित आहे. यानंतर विकासचे त्या महिलेच्या कुटुंबाने आभार मानले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा:




