सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन; रोहित पवार म्हणाले…

CJI Bhushan Gavai Attack | भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) बी.आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या 71 वर्षीय वकिलाला पोलिसांनी चौकशीनंतर सोडून दिले आहे. आरोपी वकिलाचे नाव राकेश कुमार असे आहे. मात्र या घटनेवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.
परंतु या प्रकरणाचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात देखील याप्रकरणी संतापाची लाट पसरली आहे. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार देखील उपस्थित आहे. CJI Bhushan Gavai Attack |
‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी,’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन आंदोलन केले जात आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (शरद पवार गट) या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘संविधान सन्मान आंदोलन’ आयोजित केले आहे. CJI Bhushan Gavai Attack |
‘लोकशाही टिकली पाहिजे’
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “मनुवादी प्रवृत्तीच्या एका वकिलाने हल्ला केला. तो आरएसएसचा कार्यकर्ता आहे. आम्ही या मनुवादी व्यक्तींचा निषेध करत आहोत. त्यांनी कितीही ताकद लावली तरी या देशातून संविधानाला कोणीही हलवू शकत नाही. लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे. पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशात वातावरण घडवून करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
नेमके काय घडले?
ही घटना सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान घडली. 71 वर्षीय एका वकिलाने मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. वकील राकेश किशोर यांच्या कडून एक चिठ्ठी जप्त केली आहे. या चिठ्ठीत “माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे. हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही,” असे लिहिले होते. CJI Bhushan Gavai Attack |
चौकशीदरम्यान वकिलाने सांगितले की, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान CJI यांनी केलेल्या टिप्पणीनंतर तो असमाधानी होता, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले.
परंतु या घटनेवर न्यायमूर्ती गवई यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. या घटनेनंतर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनीही एकमुखाने अशा कृतींचा निषेध करत न्यायालयाच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. मात्र या घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. CJI Bhushan Gavai Attack |
हेही वाचा :
शिल्पा शेट्टीची आर्थिक गुन्हे शाखेकडून साडे चार तास चौकशी; काय आहे नेमकं प्रकरण?




