करीना कपूरच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

The Buckingham Murders | अभिनेत्री करीना कपूरच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात करीना कपूर मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. करीना कपूर खान तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. यावेळीही ती सर्वांना प्रभावित करण्यासाठी सज्ज आहे.
हंसल मेहता दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित हा चित्रपट मिस्टर जॉनरमध्ये एक उत्कृष्ट जोड असणार आहे. करीना आणि एकताने याआधी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केले आहे. या चित्रपटात ती हंसल मेहतासोबत काम करत आहे.
View this post on Instagram
द बकिंगहॅम मर्डर्स 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात करीना कपूर खान, ऍश टंडन, रणवीर ब्रार आणि किथ ऍलन यांच्यासोबत उत्कृष्ट कलाकार आहेत. The Buckingham Murders |
बालाजी टेलिफिल्म्स प्रस्तुत आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांची निर्मिती आहे. याआधी करीना कपूर ‘क्रू’ चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तब्बू आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता तिच्या ‘द बकिंघम मर्डर्स’च्या पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा:





