‘DU मधून पॉलिटिकल सायन्स, UK मधून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयात पदवी’ मेहबूबा मुफ्ती यांची लेक इल्तिजा मुफ्ती चर्चेत

Assembly Elections Jammu Kashmir । पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत पदार्पण करणार आहे. इल्तिजा दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक कौटुंबिक बालेकिल्ला असलेल्या बिजबेहरा येथून निवडणूक लढवणार आहे. पीडीपीच्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या इल्तिजा या पक्षप्रमुखांचे मीडिया सल्लागार म्हणून काम करत आहे.
Assembly Elections Jammu Kashmir । मेहबुबा मुफ्ती निवडणूक लढवणार नाहीत?
पीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेहबुबा मुफ्ती आता आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. असे बोलले जात आहे की मेहबुबा आता मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार असून यावेळी त्या विधानसभा निवडणूक लढवण्यापासून दूर राहतील. अशात आता पीडीपीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती सध्या चांगल्याच चर्चेत आहे.
Assembly Elections Jammu Kashmir । जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी.
इल्तिजा बिजबेहरा येथील उमेदवार आहेत
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती (३७) दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारा येथून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. या बाबत सोमवारी ही घोषणा करण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जाहीर केलेल्या 8 उमेदवारांच्या यादीत इल्तिजा मुफ्ती यांच्या नावाचाही समावेश आहे. बिजबेहरा हा मुफ्ती कुटुंबाचा पारंपारिक गड मानला जातो.
DU मधून राज्यशास्त्रात पदवीधर
इल्तिजा मुफ्तीबद्दल सांगायचे तर, ‘दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात बॅचलर डिग्री आणि युनायटेड किंगडमच्या वॉर्विक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत असताना त्यांना मीडिया सल्लागार म्हणून नेमण्यात आले तेव्हा इल्तिजा पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या आहे. ऑगस्ट 2019 मध्ये, जेव्हा संपूर्ण काश्मीरमध्ये संचारबंदी होती, तेव्हा इल्तिजा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक धाडसी पत्र लिहून विचारले होते की त्यांना श्रीनगरच्या निवासस्थानी नजरकैदेत का ठेवण्यात आले आहे.’
त्या कधी प्रसिद्धीच्या झोतात आल्या
इल्तिजाला घाटी सोडण्याची परवानगी देण्यात आली, त्यांनी त्यावेळी आईला भेटण्याची परवानगी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, अखेर त्यांना या साठी परवानगी मिळाली. मेहबूबा मुफ्ती यांच्या सुटकेनंतर, इल्तिजा यांनी मीडिया संवाद आणि मीटिंगमध्ये तिच्यासोबत दिसली. जून २०२२ मध्ये, इल्तिजाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “आपकी बात विथ इल्तिजा” नावाची पाक्षिक व्हिडिओ संवाद मालिका सुरू केली.
पासपोर्ट प्रकरणही चर्चेत
इल्तिजा या दोन बहिणींमध्ये मोठ्या आहे. त्यांचे वडील जावेद इक्बाल शाह, एक व्यापारी आणि कधीकाळी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, कुटुंबापासून दूर गेले होते म्हणून त्यांची आई मुफ्ती यांनी त्यांना एकटेच वाढवले. इल्तिजा यांची धाकटी बहीण श्रीनगरमध्ये जनसंपर्क व्यावसायिक आहे. 2023 मध्ये, इल्तिजा यांनी पासपोर्टच्या नूतनीकरणावरून अधिकाऱ्यांशी संघर्ष केला. त्याच्या पासपोर्टची मुदत 2 जानेवारी रोजी संपली होती आणि त्यांनी 8 जून 2022 रोजी नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला होता.





