Kareena Kapoor trolled : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. आजही चित्रपटगृहात ‘धुरंधर 2’ची जादू कायम आहे. मात्र बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने चित्रपटाच्या यशावर दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे. करीनाच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांकडून तिच्यावर टीका केली जात आहे. एका मुलाखतीत करीना म्हणाली की, “हा चित्रपट केवळ मुख्य अभिनेता रणवीर सिंगचा नाही, तर पूर्णपणे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. आजही जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा त्याला ‘आदित्य धर यांचा धुरंधर’ म्हटले जाते.” करीना कपूरच्या या वक्तव्यावर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवत या चित्रपटाच्या मागे दिग्दर्शकाची अधिक मेहनत होती, असं म्हटलं. तर काहींनी करीनावर पक्षपातीचा आरोप केला. Kareena Kapoor trolled dhurandhar 2 एका युजरने म्हटले की, “तिला ‘धुरंधर’चे यश पचनी पडलेले नाही, ती रणवीर सिंगच्या मेहनतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.” काही नेटकऱ्यांनी करीनाला तिचे जुने संदर्भ देत सुनावले आहे. आणखी एकाने विचारले, “मग ‘जब वी मेट’ला इम्तियाज अलींचा चित्रपट म्हणावे का, करीनाचा नाही?” तर दुसऱ्याने लिहिले, “मग ‘रामायण’ हा चित्रपट रणबीर कपूरचा नसून फक्त नितेश तिवारींचा आहे असे मानायचे का?” दरम्यान, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. Kareena Kapoor trolled हेही वाचा: Congress on Baramati Election: “बारामती पोटनिवडणूकीतून काँग्रेस माघार घेणार, निर्णय दिल्ली हायकमांडला कळवणार”