Kareena Kapoor | इटालियन फॅशन कंपनी प्राडाने कोल्हापुरी चप्पलसारखं दिसणारी चप्पल लाँच केली आणि एकच वाद सुरू झाला. अवघ्या देशभरात कोल्हापुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चप्पलची कॉपी केल्याची टीका प्राडावर करण्यात आली. आता करिना कपूरनेही प्राडावर भारतीय शैलीची कॉपी केल्याबद्दल टीका केली आहे. अस्सल कोल्हापुरी चप्पलांचा एक मस्त फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केला. करिना कपूरची पोस्ट करीना सध्या तिच्या कुटुंबासह लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. येथील एक फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर निवांत बसलेली दिसते. फोटोमध्ये, तिच्या पायात कोल्हापुरी चप्पलही दिसत आहे. फोटो शेअर करत करिनाने लिहिलं की, ‘माफ करा प्राडा नाही, माझी ओजी कोल्हापुरी.’ करिना कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच इटालियन फॅशन हाऊसने त्यांच्या मेन्स स्प्रिंग समर २०२५ कलेक्शनमध्ये एक चप्पल सादर केली, जी अगदी भारतीय कोल्हापुरी चप्पलसारखी दिसत होती. प्राडाचं हे कलेक्शन जेव्हा जगासमोर आणलं गेलं तेव्हा त्यांच्यावर कोल्हापुरी चप्पल कॉपी केली म्हणून प्रचंड टीका झाली. त्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की त्यांनी ते डिझाईन कोल्हापुरी चप्पल पाहूनच तयार केलं आहे. Kareena Kapoor | करिनाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर, ती ‘दायरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत असून सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. Kareena Kapoor | हेही वाचा : सोन्याचे भाव पुन्हा घसरले ; आजच खरेदी करा पण अगोदर किंमत वाचून घ्या