Daayra movie Update: मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ चित्रपटाच्या शूटिंगबाबत पृथ्वीराज सुकुमारनने दिली अपडेट, करीना कपूरसोबत शेअर केले खास फोटो

Daayra movie Update : दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या आगामी क्राइम थ्रिलर चित्रपट ‘दायरा’ संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, ही माहिती खुद्द अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी अभिनेत्री करीना कपूर खान हिच्यासोबतचा एक खास फोटोही शेअर केला आहे.
पृथ्वीराज सुकुमारनची पोस्ट
पृथ्वीराज सुकुमारनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘दायरा’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि अभिनेत्री करीना कपूर खानही दिसत आहेत.
View this post on Instagram
फोटो शेअर करताना पृथ्वीराजने कॅप्शनमध्ये लिहिले, “#Daayra चे शूटिंग पूर्ण झाले आहे. सेटवरची ही कथा आता 2026 मध्ये जगभरातील प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात येणार आहे.”
चित्रपट ‘दायरा’ बद्दल माहिती
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले असून, सध्या हा चित्रपट पोस्ट-प्रोडक्शन टप्प्यात आहे. जंगली पिक्चर्स आणि पेन स्टुडिओज यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे शूटिंग सुमारे 13 आठवडे चालले असून, सप्टेंबर महिन्यात त्याची सुरुवात झाली होती. चित्रपटात करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘दायरा’ हा चित्रपट 2026 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





