करीना कपूर खान ओटीटीवर करणार धमाकेदार पदार्पण

मुंबई – आजकाल OTT चा ट्रेंड जोरात चालू आहे.चित्रपटगृहांपेक्षा आता ओटीटीवर चित्रपट पाहणे ही लोकांची पसंती बनली आहे. OTT वर आलेल्या अनेक वेब सिरीजना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, आणि त्या प्रचंड हिट झाल्या. यामुळेच आता प्रसिद्ध सुपरस्टार्सही ओटीटीवर काम करण्यास प्राधान्य देऊ लागले आहे. बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर आपला अभिनय आणि ग्लॅमर जोडलेल्या अनेक अभिनेत्री देखील OTT वर पदार्पण करणार आहेत. यामध्ये करीना कपूर नावांचा समावेश आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच OTT वर पदार्पण करणार आहे. करीन चित्रपट निर्माते सुजॉय घोष यांच्या क्राइम थ्रिलर चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे नाव किंवा रिलीज तारखेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती याक्षणी प्रसिद्ध झालेली नाही.
करीना कपूर खानला क्राइम थ्रिलरमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. आता करीना कपूर खानने व्हिडिओ शेअर केला आहे. जो वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, अनेक चित्रपट निर्माते करीनासोबत ओटीटी चित्रपटांसाठी कल्पना घेऊन येत आहे अशात करिनाने या सर्व कल्पना नाकारल्या आणि निर्मात्यांकडून एक उत्तम क्राईम थ्रिलर चित्रपटाची मागणी केली. करिनाचा हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे नाव जाने जान असे सांगितले जाते. व्हिडिओ शेअर करताना करीना कपूर म्हणाली, ‘आता ‘पू’ आणि ‘गीत’च्या पलीकडे काहीतरी नवीन करण्याची वेळ आली आहे. करीना कपूरला पूर्णपणे नवीन अवतारात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.





