kapil sharma : ‘कपिल शर्मा’च जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; व्हिडीओ पाहून तुमचेही उडतील होश !

Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या विनोदी शैलीमुळे लोकप्रिय आहे. कॉमेडियन शोसह त्याने चित्रपटात देखील उत्तम अभिनय केला आहे. ‘किस किस से प्यार करु’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने सिने इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. यानंतर कपिल ‘किस किस से प्यार करु’ च्या सीक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शुटींग मुंबईत सुरू झाल्याची माहिती देखील त्याने काही दिवसांपूर्वी दिली होती.
‘किस को प्यार करु’च्या सीक्वलच्या दिग्दर्शन अनुपम गोस्वामी करणार आहेत. याशिवाय रजत जैन, गणेश जैन आणि अब्बास मस्तान यांची निर्मीती आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात कपिल शर्मासोबत अभिनेत्री सई लोकूर, जेमी लीव्हर, अरबाज खान, मंजिरी फडणीस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम, वरुण शर्मा, सुप्रिया पाठक, शरत सक्सेना आणि मनोज जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
अशातच कपिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात कपिल प्रचंड बारीक झालेला दिसतोय. कपिलचं बदललेलं हे रुप त्याचे चाहते थक्क झालेत. कपिल शर्माला त्याच्या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींकडून आणि इतरांकडूनही त्याच्या वजनाबद्दल टोमणे ऐकायला मिळाले आहेत.
View this post on Instagram
कपिलने गेल्या काही वर्षात स्वतःमध्ये जबरदस्त बदल करुन सर्वांची बोलती बंद केलीय. परंतु कपिलचा हा नवीन व्हिडीओ समोर आल्याने त्याच्या चाहत्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले आहेत. कपिलने नुकतीच राजा भोज यांनी निर्माण केलेल्या भोजपुर शिव मंदिरला भेट दिली. यामध्ये तो प्रचंड बारीक झाल्याचं दिसून येत आहे.
‘किस किस को प्यार करु’ या सिनेमाच्या सीक्वलचं शूटिंग सुरु असल्यामुळे कपिलन हे वजन घटवलं असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक कपिल कसा बारीक झालाय? तो आजारी तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र, सिनेमासाठी त्यानं वजन कमी केलं असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे.





