नवी दिल्ली – CUET, JEE, NEET, CAT, CLAT आणि इतर प्रवेश परीक्षांद्वारे यावर्षी देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) प्रवेश घेणाऱ्या करोडो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कायदा आणि इतर महाविद्यालयांची नवीनतम क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज, सोमवार, 12 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे. (NIRF Overall Ranking 2024)
Hon’ble Union Minister for Education, Shri @dpradhanbjp, will release the India Rankings 2024 for Higher Education Institutes and award the top-ranking institutes today. Minister of State for Education, @DrSukantaBJP, will also be present at the event, which will be held at… pic.twitter.com/54cJ0NGcJb
— Ministry of Education (@EduMinOfIndia) August 12, 2024
मंत्रालयाने जाही केलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी 3 वाजेनंतर विविध श्रेणींमध्ये (NIRF Overall Ranking 2024) टॉप कॉलेजची रँकिंग जाहीर केली. त्यानंतर हे अधिकृत वेबसाइट nirfindia.org वर प्रकाशित करण्यात आले आहे.
2015 पासून दरवर्षी शिक्षण मंत्रालयाकडून उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. मंत्रालयाने ठरवून दिलेल्या विविध पॅरामीटर्सच्या आधारे ही रँकिंग कॉलेजांना दिली जाते. या मानकांमध्ये लर्निंग रिसोर्सेस, रिसर्च एण्ड प्रोफेशनल प्रैक्टिस, ग्रेजुएशन आउटकम, आउटरीच एण्ड इन्क्लूजीविटी आणि पर्सेप्शन यांचा समावेश आहे.
संस्था – शहर – रँक
आयआयटी मद्रास – चेन्नई -1
IISc – बेंगळुरू – 2
आयआयटी बॉम्बे – मुंबई – 3
आयआयटी दिल्ली – दिल्ली – 4
आयआयटी कानपूर – कानपूर -5
IIT खरगपूर – खरगपूर – 6
एम्स नवी दिल्ली – दिल्ली – 7
IIT रुड़की – रुड़की – 8
IIT गुवाहाटी – गुवाहाटी – 9
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) – दिल्ली – 10