BCCI Family Rule : ‘कुटुंबाची गरज आहे पण…’, विराटच्या कुटुंबाबद्दलच्या वक्तव्यावर कपिल देव यांची प्रतिक्रिया

BCCI family rule Kapil Dev on Virat Kohli Statement : दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव हे खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबासह दौऱ्यावर जाण्याच्या बाजूने आहेत. परंतु त्यांनी या वादग्रस्त मुद्द्याला हाताळताना संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहनही केले आहे. या मुद्द्यावर वेगवेगळी मते आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या १-३ कसोटी मालिकेतील पराभवानंतर, बीसीसीआयने एक निर्देश जारी केले. या निर्देशानुसार ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या दौऱ्यात कुटुंबाता खेळाडूसोबत थांबण्याचा कालावधी मर्यादित केला आहे.
कपिल देव काय म्हणाले?
आता कुटुंबे जास्तीत जास्त १४ दिवस खेळाडूंसोबत एकत्र राहू शकतात. लहान दौऱ्यासाठी, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त एका आठवड्यासाठी सोबत आणू शकतात. यावर कपिल देव म्हणाले की कुटुंबाची गरज आहे, पण संघही महत्त्वाचा आहे. १९८३ चा विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव म्हणाले, ‘मला माहित नाही, ही वैयक्तिक बाब आहे. मला वाटतं हा क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे. याचा अर्थ असा की कुटुंब सोबत ठेवायचे की नाही हे खेळाडूवर अवलंबून आहे. पण अंतिम निर्णय फक्त क्रिकेट बोर्डच घेईल.’
आपला संघही महत्त्वाचा – कपिल देव
कपिल देव पुढे म्हणाले, ‘माझ्या मते, तुम्हाला कुटुंबाची गरज आहे. पण तुम्हाला नेहमीच एका टीमची आवश्यकता असते.’ कुटुंब आणि संघ दोन्ही एकत्र असणे महत्त्वाचे आहे असे त्याचे मत आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंचे कुटुंब दुबईमध्ये त्यांच्यासोबत होते. पण ते टीम हॉटेलमध्ये राहिला नव्हते. त्यांचा राहण्याचा खर्च बीसीसीआयने केला नव्हता तर खेळाडूंनी स्वतः केला होता.
हेही वाचा – Kabaddi World Cup 2025 : कबड्डी विश्वचषकात टीम इंडियाची शानदार सुरुवात! एकतर्फी सामन्यात इटलीला चारली धूळ
पहिले प्राधान्य क्रिकेटला द्या – कपिल देव
माजी कर्णधार पुढे म्हणाले, ‘आमच्या काळात, आम्ही स्वतःला सांगत होतो, क्रिकेट बोर्ड नाही, दौऱ्यात पहिले प्राधान्य क्रिकेटसाठी असावे आणि दुसरे प्राधान्य कुटुंबाला असावे. कारण कुटुंबावाही आनंद घेता यावा आणि हे मिश्रण असावे. याचा अर्थ प्रथम क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा आणि नंतर कुटुंबासोबत वेळ घालवा.’
विराट कोहली काय म्हणाला होता?
दौऱ्यांदरम्यान खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याच्या कल्पनेला विराट कोहलीनेही पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला की कठीण काळात हॉटेलमध्ये एकटे राहण्यापेक्षा त्याला त्याच्याभोवती वैयक्तिक आधार असणे जास्त आवडते. कोहली म्हणाला, ‘मी माझ्या हॉटेलच्या खोलीत एकटे राहण्यापेक्षा मैदानावरील कठीण आणि तणावपूर्ण दिवसांना तोंड देण्यासाठी नेहमीच माझ्याभोवती कुटुंबाचा आधार असणे पसंत करेन.’





