Kabaddi World Cup 2025 : कबड्डी विश्वचषकात टीम इंडियाची शानदार सुरुवात! एकतर्फी सामन्यात इटलीला चारली धूळ

Kabaddi World cup 2025 Team India beat Italy : टीम इंडियाने २०२५ च्या कबड्डी विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इटलीला ६४-२२ असे पराभूत केले. टीम इंडियाविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात इटलीचा संघ बॅकफूटवर दिसला. भारतीय रेडर्स आणि डिफेंडर्सनी मिळून विरोधी संघाला घाम फोडला.गतविजेत्या भारतीय संघाच्या रेडर्स संघाने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या क्वार्टरमध्ये त्यांनी १५-२ अशी आघाडी घेतली.
टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात –
विशेष म्हणजे आशिया खंडाबाहेर कबड्डी विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दमदार सुरुवात करताना पहिल्या क्वार्टरमध्ये घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. डिफेंडर्सनी आपली जादू दाखवल्याने इटलीचा संघ लवकरच ऑल आऊट झाला. इटलीच्या रेडर्सना गुण मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता, तर भारतीय रेडर्सना रोखण्यात त्यांचे डिफेंडर्स पूर्णपणे अपयशी ठरले.
Well that was some morning of action!
Here's a round up of the results so far… with four games remaining of day one in Wolverhampton.#kabaddi #kwc25 pic.twitter.com/mn110jTIrg
— kabaddiworldcup2025 (@kabaddiwc2025) March 17, 2025
पहिल्या हाफच्या अखेरीस भारतीय संघाने आपली आघाडी ३६ गुणांपर्यंत वाढवली. इटलीच्या रेडर्सनी खूप प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी सतर्क भारतीय डिफेंडर्सच्या नाकाखालून गुण मिळविण्यात त्यांना अपयश आले.
हेही वाचा – IPL 2025 Replacement Rule : BCCI ने आयपीएलच्या नियमात केला बदल, ‘या’ सामन्यापर्यंत संघात करता येणार बदल
दुसऱ्या हाफमध्येही भारताची कामगिरी सरसच राहिली –
दुसऱ्या सत्रातही भारतीय रेडर्सनी उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस, भारतीय संघाने आपली आघाडी ५० पर्यंत वाढवली. तीन क्वार्टरनंतर, भारताने ५२ गुण मिळवले, तर इटलीचा स्कोअर १७ होता. चौथ्या सत्रातही परिस्थिती अशीच राहिली आणि भारतीय रेडर्सनी सहज गुण मिळवले. भारतीय संघाने शेवटच्या क्वार्टरमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आणि सामना ६४-२२ अशा फरकाने जिंकला. गेल्या विश्वचषकात भारतीय संघाने इराकचा पराभव करून जेतेपद पटकावले होते.

