मुहूर्त ठरला! ‘कांतारा चॅप्टर 1’ रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. लोक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. यादरम्यान आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
कांतारा चॅप्टर 1 ची रिलीज डेट आली समोर
अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. रिषभ शेट्टीने सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा केली आहे.’कांतारा : चॅप्टर 1′ 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘कांतारा’ चित्रपटामध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध ‘भूत कोला’ उत्सवाची कथा दाखवण्यात आली होती, तर आता ‘कांतारा : अध्याय 1’ मध्ये कदंब कालावधीचा शोध घेतला जाईल. कदंब काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या आकर्षक समृद्धी आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये कदंब काळातील कथा पाहायला मिळणार आहे.





