‘कांतारा’मुळे होतेयं जिची चर्चा! कोण आहे ती सुंदरा? २८ व्या वर्षांतच मिळाली मोठी लोकप्रियता जाणून घ्या अभिनेत्रीविषयी…

Who is Rukmini Vasant? : सध्या कांतारा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर नवा इतिहास रचला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करत तब्बल ६० कोटींचा गल्ला मिळवला आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा होत असून, कलाकारांच्या अभिनयाचं देखील कौतुक केलं जात आहे.
या सिनेमातील मुख्य भूमिकेत असलेल्या साऊथ सिनेमा इंडस्ट्रीतील अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिच्या नावाची जोरदार चर्चा केली जात आहे. या अभिनेत्रीच्या अभिनयाचं देखील तोंडभरून प्रेक्षक कौतुक करत आहेत. त्यामुळे रुक्मिणी वसंत नेमकी कोण आहे? या विषयी जाणून घेऊयात….
कांतारा चॅप्टर १ मधील अभिनेत्री रुक्मिणी वसंत ही केवळ एक प्रतिभावान अभिनेत्रीच नाही तर एक नृत्यांगना देखील आहे. तिने भरतनाट्यममध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. १० डिसेंबर १९९६ रोजी तिचा जन्म झाला. तिने आपलं शैक्षणिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमधील रॉयल अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमधून पदवी प्राप्त केली.
तिचे वडील एक लष्करी अधिकारी होते, त्यांना देशाची सेवा करताना वीर मरण आलं. रुक्मिणी वसंतने २०१९ मध्ये “बिरबल” या कन्नड सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ती “बघीरा” आणि “मद्रासी” यांसारख्या सिनेमात दिसली. तिने कन्नड, हिंदी, तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती बहुचर्चित टॉक्सिक सिनेमातही दिसणार आहे.
या सिनेमामुळे चर्चेत आली.
खरंतर अभिनेत्री रुक्मिणी वसंत कांतारामुळे चर्चेत आली असली तरी ती आणखी एका सिनेमामुळे चर्चेत आली होती. “सप्त सागरदाता एलो” या रोमँटिक सिनेमामुळे तिला साऊथ सिनेमात मोठी लोकप्रियता मिळाली. या सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. अभिनेत्री रुक्मिणी वसंत शिवाय गुलशन देवैया आणि जयराम यांच्याही कांतारा सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : “युरोपीय नेत्यांनी मोदींकडून काहीतरी शिकावे” ; डच सेमीकंडक्टर कंपनीकडून पंतप्रधानांचे कौतुक





