साऊथचा सुपरस्टार अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

Chhatrapati Shivaji Maharaj | अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली. यानंतर ‘कांतारा 2’ चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान आता ऋषभ शेट्टीचे आगामी चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात दिसत आहे.
ऋषभच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ असे आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंह करत आहेत. या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेन्टचा वर्षाव केला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ऋषभ शेट्टी आणि दिग्गज दिग्दर्शक संदीप सिंह यांनी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर साकारण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
ऋषभ शेट्टीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आपला सन्मान आणि विशेषाधिकार, भारताचा महान योद्धा राजाची महाकाव्य गाथा प्रस्तुत करतोय. द प्राइड ऑफ भारत: छत्रपति शिवाजी महाराज. हा फक्त एक चित्रपट नाही तर, एका योद्धाच्या सन्मानार्थ एक लढाईचा युद्धघोष आहे, ज्यानं सर्व अडचणींविरुद्ध लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान दिलं आणि कधीही न विसरता येणारा वारसा निर्माण केला.’
दरम्यान, छत्रपती शिवरायांची भूमिका साकारताना ऋषभला पाहण्यासाठीचाहतेही उत्सुक आहेत. मात्र त्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. 21 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे या पोस्टरद्वारे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:
चिन्मय दास यांच्या जामिनावर एका महिन्यानंतर सुनावणी ; कट्टरपंथीयांच्या भीतीने सर्व वकील गैरहजर





