‘कांतारा 2’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित; पाहा ऋषभ शेट्टीचा रुद्र अवतार

Kantara 2 Teaser Release | ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षेत ‘कांतारा 2’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यशानंतर ऋषभ शेट्टीने ‘कांतारा 2’ ची घोषणा केली होती, तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच ऋषभ शेट्टीने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती.
आता ‘कांतारा अ लिजेंड चॅप्टर 1’ या शीर्षकासह 82 सेकंदाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. यावेळची कथा कदंब वंशाच्या राजवटीची असेल हे टीझरवरून स्पष्ट झाले आहे. टीझरची सुरुवात ‘क्षण आला आहे. दैवी जंगल कुजबुजते आहे,’ असे ऐकू येते. यात काळ्या पडद्यावर काहीतरी जळताना दिसत आहे.
तर अस्पष्ट चित्रात शिवा (ऋषभ शेट्टी) टॉर्च घेऊन जंगलातून चालताना दिसत आहे. त्याला अग्नीने वेढले असताना, एक आवाज ऐकू येतो, ‘प्रकाश! प्रकाशात सर्व काही दिसते, पण हा प्रकाश नाही! ती एक दृष्टी आहे. काल काय होते, काय आहे आणि काय असेल हे दाखवणारी दृष्टी! तुला दिसत नाही का?’
तेव्हा अंधारात शिवाचा चेहरा समोर येतो. गुहेत पौर्णिमा दिसत असताना रक्ताने माखलेला माणूस त्रिशूळसोबत गळ्यात रुद्राक्ष आणि लांब केसांसह ऋषभ दिसतो आणि तेव्हा त्याच्या डोळ्यांत चमकणाऱ्या आगीचे निखारे दिसतात. ऋषभचा या चित्रपटातील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान,’ कांतारा’ हा चित्रपट ऋषभ शेट्टीने लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता ‘कांतारा अ लिजेंड चॅप्टर १’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी रिलीज होणार आहे. कांतारा २ कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर आता या चित्रपटाची चाहत्यांना फार उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा:





