Kanimozhi on Anurag Thakur। तामिळनाडूच्या द्रमुक खासदार कनिमोझी यांनी भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. अनुराग ठाकूर यांनी गेल्या महिन्यात एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर,” हनुमानअंतराळात जाणारा पहिला व्यक्ती होता” असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर द्रमुक खासदार कनिमोझी यांनी त्यांच्या या विधानावर टीका केली आहे. द्रमुक खासदार कनिमोझी यांनी अनुराग ठाकूर यांच्यावर टीका करताना, “जर तुम्ही चंद्रावर पहिल्यांदा कोण गेले हे एखाद्या मुलाला विचारले तर तो नील आर्मस्ट्राँगचे नाव घेईल मात्र काही उत्तरेकडील नेते हनुमानाने तिथे पहिले पाऊल ठेवत होते.असे म्हणतील आणि आपलं सुदैव आहे कि असे लोक तामिळनाडूमध्ये नेतृत्वाच्या पदांवर नाहीत.” असे म्हणत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. द्रमुक खासदाराने निशाणा साधला पुढे बोलताना खासदार कनिमोझी यांनी, “प्राचीन काळातही, जेव्हा तमिळ लोकांनी युद्ध जिंकले, तेव्हा त्यांनी कधीही त्या भूमीतील लोकांचा किंवा त्यांच्या संस्कृतीचा नाश केला नाही. ” असे म्हटले. दरम्यान, द्रमुक खासदाराने अनुराग ठाकूर यांच्यावर टीका करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही, त्यांनी या टिप्पणीवर त्यांना घेरले आहे. ऑगस्ट महिन्यात, त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, “एका खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांनी शाळेतील मुलांना अंतराळात पहिले पाऊल कोण ठेवले असे विचारणे आणि नंतर ते नील आर्मस्ट्राँग नसून हनुमान होते असा आग्रह धरणे अत्यंत त्रासदायक आहे. विज्ञान ही मिथक नाही. वर्गातील तरुणांना दिशाभूल करणे हे आपल्या संविधानात समाविष्ट असलेल्या ज्ञान, तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या भावनेचा अपमान आहे.” असे त्यांनी म्हटले. अनुराग ठाकूर काय म्हणाले? Kanimozhi on Anurag Thakur। भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑगस्ट महिन्यात त्यांच्यासोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, “ज्यामध्ये ते शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण देत होते. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मुलांशी बोलताना त्यांनी विज्ञान आणि पौराणिक कथांचे मिश्रण केले आणि म्हटले होते की आपण ब्रिटिशांनी दिलेल्या पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विचार केला पाहिजे.त्यांनी म्हटले होते की, मला वाटते की हनुमानजी हे अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते. आमचे वेद, आमची पुस्तके आणि आमचे ज्ञान.”असे म्हटले होते. तमिळ भाषेबद्दल काय म्हटले? Kanimozhi on Anurag Thakur। द्रमुक खासदार कनिमोझी यांनीही तमिळ भाषेबद्दल बोलले. ते म्हणाले, “तमिळ भाषा ही एक प्राचीन भाषा आहे जी अनादी काळापासून लोक वापरत आहेत. मात्र, संस्कृत आता सामान्य बोलीभाषा राहिलेली नाही. तरीही, केंद्र सरकार संस्कृतसाठी मोठ्या प्रमाणात निधी देत आहे. महाराष्ट्रात, हिंदीसारख्या भाषा स्वीकारल्यामुळे राज्यभाषा मराठीचे महत्त्व कमी झाले आहे. तमिळनाडूमध्ये असे नाही. जेव्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. म्हणूनच केवळ तमिळ भाषाच नाही तर तिची संस्कृती आणि परंपरा देखील जपली आणि प्रचलित आहेत.”