Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत कंगना राणावत विजय; पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली….

Lok Sabha Election 2024 | Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहे. कंगनाने निवडणूक लढवल्यानंतर मंडी हिमाचलमधील सर्वाधिक चर्चेची जागा बनली आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आहे.
अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. मात्र, आता कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर 73 हजार मतांनी मात केली आहे. कंगनाला 503790 जनतेनं मत दिलं. तर, विक्रमादित्य सिंह यांना 430534 मतं मिळाली आहेत.
समस्त मंडीवासियों का इस जनाधार, इस प्यार और विश्वास के लिए दिल से आभार🙏🏻
ये जीत आप सभी की है, ये जीत है प्रधानमंत्री मोदी जी और भाजपा पर विश्वास की, ये जीत है सनातन की, ये जीत है मंडी के सम्मान की। pic.twitter.com/elRmMJOneE
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 4, 2024
दरम्यान, पहिलीच निवडणूक असून त्यामध्ये देखील प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आमचे नेता नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे.
माता ईश्वर का रूप है, आज मेरी माँ मुझे दही शक्कर खिलाती हुई 🥰🙏 pic.twitter.com/07O66nC5O0
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 4, 2024
त्यामुळे भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भाविष्य आता उज्वल असणार आहे…. असं म्हणत कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.’ असं कंगना म्हणाली आहे.
कंगनाने आईसोबत काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये कंगना आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवळा आहे.
भाजपच का?
कंगनाला जेव्हा विचारण्यात आले की, ती राजकारणासाठी भारतीय जनता पक्षात (भाजप) का सामील झाली, तेव्हा ती म्हणाली की भाजपशी नैसर्गिक संबंध आहे. कंगना म्हणाली, “लोकांची सेवा करणे हा प्रत्येकाचा कप ऑफ टी नसतो. माझ्यासह प्रत्येकाची वेगळी वेगळी स्वप्ने असतात.
मी 20 वर्षे फिल्म इंडस्ट्रीत होते आणि खूप छान आयुष्य जगले. मी स्वत:ला नेता म्हणून पाहत नाही. मी पाहते. केवळ जनतेची सेवा करण्यासाठी भाजपचा उमेदवार. माझा भाजपशी नैसर्गिक स्नेह आहे. माझ्या हक्कांसाठी लढण्यासाठी भगवद्गीतेच्या शिकवणुकीवर माझा विश्वास आहे.





