Kangana Ranaut | कानशिलात मारणाऱ्या ‘त्या’ कॉन्स्टेबलचे समर्थन करणाऱ्यांवर कंगना राणावत भडकली, ट्विट करत म्हणाली….

Kangana Ranaut | CISF constable – अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांच्या कानशिलात मारणाऱ्या सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलला देशभरातून मोठे समर्थन मिळत आहे. त्यावर कंगना यांनी संताप व्यक्त केला आहे, हे लोक बलात्कार आणि खून करणाऱ्यांचे अशाच प्रकारे समर्थन करणार आहेत काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की जर तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याला समर्थन देत असाल तर त्यातून लोकांना देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करून गुन्हा करण्याची तीव्र प्रेरणा मिळणार आहे ही बाब त्यांनी ध्यानात ठेवावी.
Every rapist, murderer or thief always have a strong emotional, physical, psychological or financial reason to commit a crime, no crime ever happens without a reason, yet they are convicted and sentenced to jail.
If you are aligned with the criminals strong emotional impulse to…— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 8, 2024
आपल्याबाबतीत जे कृत्य झाले त्याचे तुम्हाला कौतुक असेल तर तुमच्यासाठी बलात्कार करणे किंवा एखाद्याला भोसकून ठार मारणे या बाबीही योग्यच ठरतात. एक्सवरील एका दीर्घ निवेदनात कंगना यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024
ही घटना घडल्यापासून सोशल मिडीयावर कंगना यांना थप्पड मारणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे कौतुक करणाऱ्या पोस्टचा वर्षाव होताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर देशभरातील शेतकरी संघटनांनी या कॉन्स्टेबलला पाठिंबा देत तिच्या समर्थनार्थ उभे राहण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान मुंबईच्या चित्रपट सृष्टीतील एका संगीतकाराने त्या महिला कॉन्स्टेबलची नोकरी गेली असेल तर आम्ही तिला नोकरी देऊ असे म्हटले असल्याचे वृत्त आहे.





