Kangana Ranaut : सोनिया गांधींच्या पुस्तकावर कंगनाची टिका; स्विस बँक खात्यांवर प्रश्नचिन्ह, राहुल गांधींवरही निशाणा
कंगना राणावत यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या. यामध्ये त्यांनी राजीव गांधींची हत्या, मेनका गांधींचे गांधी कुटुंबापासून विभक्त होणे आणि सोनिया गांधींचे नागरिकत्व यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला.

Kangana Ranaut – बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी येथील भाजप खासदार कंगना रणौत आपल्या स्पष्टवक्त्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चरित्रावर निशाणा साधला आहे. कंगनाने या पुस्तकात गांधी कुटुंबाशी संबंधित अनेक घटनांच्या उल्लेखावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांनी सोनिया गांधींच्या आत्मचरित्राला सेल्फ-गोल संबोधून त्यांच्यावरही टीका केली आणि राहुल गांधींनाही निशाणा साधला. राहुल गांधींना सेल्फ-गोल करण्याचे हे कौशल्य त्यांच्या आईकडून वारसा म्हणून मिळाले आहे, असेही त्या म्हणाल्या.
खरे तर, कंगना राणावत यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या. यामध्ये त्यांनी राजीव गांधींची हत्या, मेनका गांधींचे गांधी कुटुंबापासून विभक्त होणे आणि सोनिया गांधींचे नागरिकत्व यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला.
त्यांनी सोनिया गांधींच्या कथित स्विस बँक खात्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजीव गांधींच्या हत्येच्या दिवशी सोनिया त्यांच्यासोबत जाणे टाळत होत्या. यासाठी त्यांनी थकवा आणि आळस ही कारणे दिली होती.
आपल्या पुढच्या पोस्टमध्ये कंगनाने मनेका गांधींच्या गांधी कुटुंबापासूनच्या दुराव्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी लिहिले की, सोनिया गांधींकडे परत जाण्यासाठी मनेका यांनी कुटुंब सोडावे, अशी अट राजीव गांधींनी घातली होती.
ही गोष्ट मनेका यांच्यासाठीही आश्चर्यकारक होती. याच सुमारास संजय गांधींच्या मृत्यूनंतर, सोनिया गांधींनी भारतात १५ वर्षे राहिल्यानंतर भारतीय नागरिकत्व घेण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या पोस्टमध्ये कंगना लिहितात की, २२ वर्षीय विधवा मनेकाला घरातून बाहेर काढण्यात आले. तिला कुटुंबातील इतर सदस्यांसोबत एकाच टेबलावर बसण्याचीही परवानगी नव्हती. आपल्या आत्मचरित्रात सोनिया गांधींनी यामागे मनेकाची विरोधी पक्षांच्या नेत्यांशी असलेली मैत्री हे कारण असल्याचे म्हटले आहे.
सर्वात श्रीमंत महिला बनला कशा?
कंगना राणावत लिहितात की, आयुष्यभर एक पैसाही न कमावता त्या १९९१ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिला कशा बनल्या? स्विस बँक खात्यांमध्ये कथितरित्या तिच्या नावावर दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम आहे.
कुटुंबातील इतर सदस्यांच्या मृत्यूनंतर, अनेकदा गरीब आणि सहानुभूतीची गरज असलेली एक इटालियन विधवा अचानक अब्जाधीश कशी बनली? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात या प्रश्नाचे उत्तर का दिले गेले नाही?





