Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही विराटला ‘या’ गोष्टीचे दुःख, मित्रासाठी झाला भावुक; म्हणाला, ‘बऱ्याच वेळा जेव्हा…’

Virat Kohli Feel Sad For Kane Williamson After Champions Trophy 2025 Final : न्यूझीलंडने भारताला पराभूत करून २०१९ च्या विश्वचषकातून बाहेर काढले होते. २०२१ च्या टी-२० विश्वचषकातही न्यूझीलंडकडून भारत बाहेर पडला होता. २०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यातही न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. या तीन सामन्यांमध्ये विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. किवी संघाचे नेतृत्व केन विल्यमसनच्या हाती होते. आता भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. यानंतर विराटने विल्यमसनबद्दल प्रतिक्रिया दिली.
विराटने मित्रासाठी व्यक्त केले दुःख –
विराट कोहली आणि केन विल्यमसन खूप चांगले मित्र आहेत. विराट कोहलीला त्याच्या मित्राचा अंतिम सामन्यात पराभव पाहून वाईट वाटते पण तो जुने दिवस विसरलेला नाही. सामन्यानंतर ब्रॉडकास्टर्सशी बोलताना तो म्हणाला, ‘माझा एक खूप चांगला मित्र (केन विल्यमसन) हारताना पाहून वाईट वाटले. पण बऱ्याच वेळा जेव्हा ते जिंकायचे, तेव्हा मी पराभूत संघात असे. म्हणूनच आमच्यात फक्त प्रेम आहे.’
𝗞𝗼𝗵𝗹𝗶 𝗼𝗻 𝗪𝗶𝗹𝗹𝗶𝗮𝗺𝘀𝗼𝗻🗣️
"I feel sad for my friend Kane Williamson, it's sad to see him on the losing side. I have lost a few finals when he has won so only love between the two of us."#KaneWilliamson #ViratKohli𓃵 pic.twitter.com/gsWXuzPBFa— Pakistan Cricket Team USA FC (@DoctorofCricket) March 10, 2025
विराटने केले न्यूझीलंडचे कौतुक –
आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाने अद्भुत कामगिरी केली आहे. यावेळीही संघाने चांगले प्रदर्शने केले. न्यूझीलंड संघाचे कौतुक करताना विराट म्हणाला की, गेल्या काही वर्षांत मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ सर्वात सातत्यपूर्ण राहिला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा स्वत:च्या कौशल्यांवर आणि प्रतिभेवरचा विश्वास आहे. ते त्याचा पुरेपूर वापर करतात. त्यांचा संघ जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन. तो जगातील सर्वोत्तम संघांमध्ये का आहे? हे तो सातत्याने दाखवत आहे. पुन्हा एकदा ही स्पर्धा शानदार राहिली.
यूं ही कोई..
विराट नहीं बन जाता..😊#ViratKohli𓃵 #KaneWilliamson pic.twitter.com/Wh9RnnSqco— ◔‿◔ (@KhusshRaho) March 3, 2025
विल्यमसन अंतिम फेरीत ठरला अपयशी –
केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज आहे. त्याने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते, पण अंतिम फेरीत तो अपयशी ठरला. कुलदीप यादवने त्याला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या धक्क्यातून किवी फलंदाजी सावरू शकली नाही आणि संपूर्ण सामन्यात संघर्ष करत राहिली. दुखापतीमुळे तो मैदानातही उतरला नाही. विल्यमसन २०१५ विश्वचषक, २०१९ विश्वचषक, २०२१ टी२० विश्वचषक आणि आता २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाचा भाग होता.





