Kamshet: कचरा समस्येवर अखेर उपाययोजना सुरू
घंटागाड्यांद्वारे होणार संकलन

कामशेत– कामशेत शहरातील गंभीर बनलेल्या कचरा समस्येवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, यापुढे घंटागाड्यांद्वारे घरगुती कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.
कचरा समस्येबाबत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. नियमित कचरा संकलन आणि योग्य विल्हेवाट लावण्याबाबत झालेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
पंचायत समिती सदस्य डॉ. समीर जाधव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कचरा व्यवस्थापनाचे काम सुरू करून घेतले. नागरिकांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता घंटागाड्यांमध्येच कचरा टाकावा आणि स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. समीर जाधव यांनी केले आहे.
ही व्यवस्था नियमित व कायमस्वरूपी सुरू राहिल्यास कामशेत शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार असल्याचे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Traffic Solution: चिंचवडच्या वाहतूक कोंडीला फुटणार वाट! चार महत्त्वाच्या प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध





