CSK vs SRH : कामिंदू मेंडिसने हवेत डायव्हिंग करत ब्रेव्हिसचा घेतला अफलातून कॅच, VIDEO होतोय व्हायरल

CSK vs SRH Kamindu Mendis Stunning Catch in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये एका शानदार कॅचने सामन्याचा मार्गच बदलला. सनरायझर्स हैदराबादच्या कामिंदू मेंडिसने चेन्नई सुपर किंग्जच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद करण्यासाठी एक शानदार कॅच घेतला. ब्रेव्हिस त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावू शकला नाही. या झेलमुळे सीएसकेचा डाव कमकुवत झाला. हा झेल इतका आश्चर्यकारक होता की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
कामिंदू मेंडिसने घेतला अफलातून कॅच –
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज कामिंदू मेंडिसने सीएसकेविरुद्ध एक अफलातून कॅच घेतला. जो आयपीएल २०२५ च्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोत्तम कॅच मानला जात आहे. या कॅच मुळे, डेवाल्ड ब्रेव्हिस अर्धशतक झळकावण्यापासून वंचित राहिला. ब्रेव्हिस सीएसकेकडून त्याचा पहिला सामना खेळत होता. त्याच्या आऊट होण्याने सीएसकेची फलंदाजी कोलमडली आणि मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
Only a catch like that could’ve stopped that cameo from Brevis! 🤯
Kamindu Mendis, take a bow 🙇#CSK 119/6 after 14 overs.
Updates ▶ https://t.co/26D3UalRQi#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/NvthsQfpUj
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
नेमकं काय आणि कधी घडलं?
सीएसकेच्या डावात १३ वे षटक टाकण्यासाठी हर्षल पटेल आला होता. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर डेवाल्ड ब्रेव्हिसने लाँग ऑफकडे मोठा शॉट मारला. मात्र, तिथे उभ्या असलेल्या मेंडिसने डावीकडे धावत हवेत झेपावत अफलातून कॅच घेतला. हा कॅच खूपच नेत्रदीपक होता. मेंडिसने ज्या पद्धतीने चेंडू पकडला तो पाहण्यासारखा होता. या कॅचने सामन्याचा मार्ग बदलला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – CSK vs SRH : फलंदाजी करण्यापासून रोखताच संतापला जडेजा; मैदानातच आपटू लागला बॅट, पाहा VIDEO
या सामन्यात सीएसकेची सुरुवात चांगली झाली नव्हती. मात्र डेवाल्ड ब्रेव्हिसने फटकेबाजी केल्याने संघ सावरत होता. पंरतु तो आऊट झाल्याने संघाची धावसंख्या ४ बाद ७४ धावा अशी झाली. डेवाल्ड ब्रेव्हिसने वेगाने धावा काढत होता. तो २५ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४२ धावा काढून तंबूत परतला. अशा प्रकारे अवघ्या आठ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले.





