Kalyan News : परप्रांतीय टोळीची मराठी माणसांना जबर मारहाण; जीवघेणा हल्ल्याचा Video व्हायरल !

Kalyan | Marathi Family : कल्याण योगिधाम आजमेरा हाईट्स सोसायटीमध्ये परप्रांतीय व मराठी या वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोसायटी मधील रहिवाशांनी सोसायटीच्या समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.
एका स्वाभिमानी मराठी कुटुंबावर परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरुन गुंड आणून कारण नसताना मारहाण केली आहे. लोखंडी रॉड, लाकडी पट्टा आणि पाईपसारख्या वस्तूंचा वापर करून हल्लेखोरांनी या मराठी कुटुंबाला मारहाण केली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला असून, सगळीकडे संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
@rashtrapatibhvn @PMOIndia @CMOMaharashtra @HMOIndia @hmo_maharashtra @DGPMaharashtra@112Maharashtra @ThaneCityPolice#Kalyan, Ajmera Height society members were brutally attacked by goons called by #Mantralaya officer #AkhileshSukla,total 5 members was brutally injured out of 1 pic.twitter.com/0461tWTD4U
— Kalyan Citizen’s Forum (KCF) (@Kalyan_KCF) December 18, 2024
काय आहे संपूर्ण घटना :
मुंबई येथील कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी त्यांचा वाद वाढला होता.
नंतर या दोन्ही अमराठी कुटुंबियांमधील सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी शेजारे राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला.
यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी शुक्ला यांनी लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत. यात विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत.
विजय यांवर मुंबई येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सूरू असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या प्रकरणी तातडीने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला असून, घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत.
अखिलेश शुक्लाचा व्हिडिओ व्हायरल :
यावेळी शुक्ला म्हणाला की, “मी मंत्रालयात काम करतो, मला कोणीच रोखू शकत नाही,” असे म्हणत धीरज यांच्यावर शब्दिक हल्ला चढवला. पुढे, शुक्ला यांनी बाहेरून आठ-दहा जणांना बोलावून देशमुख कुटुंबावर हल्ला केला. धीरज यांचा भाऊ अभिजित देशमुख याला सोसायटीच्या गेटबाहेर बोलावून धारदार शस्त्राने डोक्यावर वार करण्यात आला. हल्ल्यात धीरज देशमुख यांच्या पत्नीवरही विनयभंग आणि मारहाणीचा प्रकार घडला.
लोखंडी रॉड, लाकडी पट्टा आणि पाईपसारख्या वस्तूंचा वापर करून हल्लेखोरांनी कुटुंबाला मारहाण केली. दरम्यान, आता या प्रकरणात मनसेनेही उडी केली आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. तसेच शुक्ला याला आमच्या हाती द्या करा, त्याला मनसे स्टाईल धडा शिकवतो असा इशारा त्यांनी दिला आहे.





