Pune District : कल्याण-अहिल्यानगर महामार्ग यमदूतच!

ओतूर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून कार आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघाता ओतूर (ता. जुन्नर) येथील दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात उदापूर (ता.जुन्नर) जवळील ढमाले मळा शिवाराजवळील हॉटेल निमंत्रण समोर घडली, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
रस्त्याचे काम चालू असल्याने या मार्गावर वाहनचालकांनी वेगाची मर्यादा ठेवून वाहने चालवावीत. मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत अन्यथा कडक कारवाई केली जाणार.
– लहू थाटे, सहायक पोलीस निरीक्षक , ओतूर
फोटो : मृत प्रेम घोडेकर
ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी व कल्याण दिशेकडून ओतूरच्या दिशेने जाणारी कार (एमएच 02 बीडी 7469) ची जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील प्रेम भरत घोडेकर (वय 25, रा. ओतूर, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये हे तातडीने घटनास्थळावर हजर होत त्यांनी पुढील कार्यवाही केली. अपघात झाल्यावर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरुळीत केली. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.





