Kalpana Kharat : कल्पना खरातचा थांगपत्ता लागेना! SIT पथक माहेरी पोहचले; नातेवाईकांनी दिली धक्कादायक माहिती
Kalpana Kharat : एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या माहेरी चौकशीसाठी गेले असताना त्यांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.

Kalpana Kharat : नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद 2020 ते 2026 या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात पीडितेला बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. यासह अनेक महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणी नाशिक न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे कुटुंब देखील अडचणीत सापडले आहे. खरातची पत्नी कल्पना खरात देखील त्याच्यासोबत सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती फरार असून तिचा शोध एसआयटीकडून घेतला जात आहे.
एसआयटीचे पथक कल्पना खरात हिच्या माहेर चौकशीसाठी गेले होते. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिन्नर मधील पाडळी येथे कल्पनाच्या माहेरी एसआयटीचे पथक गेले होते. तिच्या नातेवाईंनी कल्पना खरातविषयी पोलिसांना माहिती दिली.
धक्कादायक माहिती
कल्पना माहेरच्या लोकांच्या जवळपास 16 वर्षापासून संपर्कात नाही. शिवाय तिला अशोक खरात माहेरी कधीही भेटायला येऊ देत नव्हता, तिने विवाह झाल्यानंतर माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. ती कधी भावालाही भेटायला आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती कल्पना खरातच्या माहेरच्यांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे 16 वर्षांपासून कल्पना तिच्या माहरच्यांचा संपर्कात का नव्हती? असा प्रश्न आहे. ती परदेशात पळून जाऊ नये यासाठी तिच्या विरोधात लूकाऊट नोटीस काढली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तिच्या मागवर असलेले पथकाला अद्यापर्यंत तिचा थांगपत्ता लागलेला नाही.
दरम्यान, कल्पना खरातने देखील नवऱ्याच्या मदतीने शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात खरातचा मुलगा हर्षवर्धनची एसआयटीने चौकशी केली आहे. या जमीन खरेदी प्रकरणात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोल आले आहे.
पोलिसांकडून त्या वस्तू जप्त
पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 22 रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळ्या रंगाचे भिंग आणि हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर कथित अघोरी कृत्यांसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : Introvert Personality: फक्त कमी बोलणं म्हणजे इंट्रोव्हर्ट नाही! या ५ सवयी सांगतात तुमची खरी पर्सनॅलिटी





