‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून दीपिकाचा पत्ता कट?

Deepika Padukone Kalki 2898 AD| अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन स्टारर चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ 27 जून रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘कल्की 2898 एडी’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आता मेकर्स या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका यांच्या जबरदस्त अभिनयाने आणि ऍक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची देखील उत्सुकता लागली आहे.
यादरम्यान आता एक अपडेट समोर आली आहे. अमिताभ बच्चन, प्रभास आणि कमल हासन पुन्हा कल्की 2898 एडीच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत, परंतु दीपिका यात नसणार, असे सांगितले जात आहे. निर्माते दुसऱ्या भागात दीपिकाच्या जागी दुसऱ्याला घेण्याचा निर्णय घेऊ शकतात.
निर्माते दीपिकाची प्रसूती रजा पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास तयार होते. पण आता पहिल्या चित्रपटाच्या वाढत्या यशामुळे आणि सिक्वेलची वाढती मागणी पाहता, निर्माते दुसऱ्या अभिनेत्रीला संधी देण्याची शक्यता आहे. Deepika Padukone Kalki 2898 AD|
परंतु अद्याप याबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती समोर आली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत दीपिका या चित्रपटाचा भाग असणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, ब्रह्मानंदम, राणा डग्गुबती, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली सी अश्विनी दत्त या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. Deepika Padukone Kalki 2898 AD|
हेही वाचा:
“आमदारांना २० ते २५ कोटी रुपये अन्…”; विधान परिषदेच्या निकालानंतर संजय राऊतांचा मोठा दावा





