Nagar | कोपरगावातून काळे तर कर्जत-जामखेडमधून शिंदेचा अर्ज

नगर, (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी चौथ्थ्या दिवशी दाखल प्रमुख अर्जात कोपरगाव मधून आ. आशुतोष काळे आणि कर्जत-जामखेडमधून आ. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तससेच शिर्डी येथून डाॅ. राजेंद्र पिपाडा, मयुर मुर्तंडक यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. तसेच संतोड कांबळे यांनी श्रीरामपूर मधून अर्ज दाखल केला आहे.
यासह उर्वरित ठिकाणी लहान-मोठ्या पक्षासह अपक्षांचा समावेश आहे. या चार दिवसात जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून 1 हजार 13 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. यातील 53 जणांचे 69 दाखल झाले आहेत. यात शुक्रवारी 20 जणांचे 27 दाखल झाले आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या आठवड्यातील चार दिवस संपले असून आता पुढील आठवड्यात सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस बाकी आहे. यामुळे या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नगर जिल्ह्यात नगर शहर मतदारसंघ वगळता उर्वरित ठिकाणच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लढती स्पष्ट झाल्या आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केलेले आहेत. यात अकाले 1 उमेदवार 1 अर्ज, संगमनेर 0, शिर्डी 2 उमेदवार 2 अर्ज, कोपरगाव 2 उमेदवार 3 अर्ज, श्रीरामपूर 1 उमेदवार 2 अर्ज, नेवासा 0, शेवगाव 3 उमेदवार 4 अर्ज, राहुरी 1 उमेदवार 2 अर्ज, पारनेर 1 उमेदवार 1 अर्ज, अहमदनगर शहर 2 उमेदवार 2 अर्ज, श्रीगोंदा 3 उमेदवार 3 अर्ज, कर्जत-जामखेड 4 उमेदवार आणि 7 अर्ज यांचा सामवेश आहे.





