Kabaddi Tournament : भुईंजमध्ये रंगणार कबड्डीचा थरार! स्व. अजित (दादा) पवार यांच्या स्मरणार्थ आयोजन
Kabaddi Tournament : अजितदादा पवार आणि मंगल (चाची) यांच्या स्मरणार्थ आयोजन; युवा नेतृत्वाची मोठी फळी मैदानात, पाहा बक्षिसांची संपूर्ण यादी.

Kabaddi Tournament – उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कै. मंगल (चाची) जाधव यांच्या स्मरणार्थ सातारा जिल्हा कबड्डी पुरुष, महिला अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा भुईंजचे उपसरपंच शुभम पवार यांनी आयोजित केली आहे. दि. ७ व ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी मैदान भुईंज येथे ही स्पर्धा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला भुईंज येथील युवा उद्योजक राजू भोसले, किसनवीर कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे यांच्यावतीने प्रथम क्रमांक ३१ हजार १ रुपये,
द्वितीय क्रमांक कुणाल पवार युवा उद्योजक २१ हजार १ रुपये, अमर वाखंडे युवा उद्योजक ११ हजार १ रुपये, तृतीय क्रमांक अनिकेत चिकणे युवा उद्योजक ७ हजार १ रुपये याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट डिफेंडर, बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, विजेत्यांना युवा उद्योजक पैलवान गणेश जाधव, व देवांश अजिंक्य सुळके यांच्यावतीने सायकल बक्षिस देण्यात येणार आहे.
कबड्डी संघांना युवा उद्योजक प्रमोद वारागडे, महालक्ष्मी उद्योग समूहाचे निरंजन कवळे यांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कै. परमेश्वर (आप्पा) गाडे यांच्या स्मरणार्थ श्री. चेतन गाडे यांच्याकडून सर्व कबड्डी संघांना चषक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी उद्योजक विनोद जाधव, सागर भिंताडे यांनी मंडपासाठी तर युवा उद्योजक सुनील शेवते, दत्ताशेठ भोसले यांनी लाईटचे विशेष सहकार्य केले आहे.
या स्पर्धेसाठी उमेश जाधव व निशांत जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. स्पर्धेतील सर्व संघांना मानांकन देण्यात येणार असून सहभागी सर्व संघांना सन्मान चिन्हे प्रदान केले जाणार आहेत. क्रीडा महोत्सवाला क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




